जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची त्रुटी पूर्ततेसाठी विशेष मोहीम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
(अहमदनगर):- अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी २८ आणि ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘विशेष मोहीम’ राबविण्यात येत आहे. अशी माहिती समितीचे सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख यांनी दिली आहे.
निवडणूक, सेवा व शैक्षणिक प्रकरणांच्या त्रुटी पूर्ततेसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या दिवशी सकाळी १० ते ६ पर्यंत अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, रेव्हेन्यू कॉम्पलेक्स, बंगालचौकी, बुरुडगल्ली, अहमदनगर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रेसह सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. असे आवाहन ही अमीना शेख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *