संगमनेरचा प्रविण मदने यांची मुंबई क्रिकेट संघात निवड:- किरण मदने…

Uncategorized

संगमनेर प्रतिनिधी:-
(किरण मदने)
कोपरगाव प्रतिनिधी:-
संगमनेर तालुक्यातील नांदूरी दुमाला या गावातील नाभिक समाजाचे श्री अण्णासाहेब मदने यांचे चिरंजीव प्रविणभाऊ मदने यांची मुंबई दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया संघात निवड झाल्याने सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यामुळे नाभिक समाजाची मान नक्कीच उंचावली आहे.
छोट्याशा कुटुंबात जन्मलेल्या परिस्थिती हातावरचीच असून वडील सलून व्यवसाय चालवितात.‌ या कठीण परिस्थितीतून चि.प्रविणभाऊने आपले कौशल्य, अपार मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर क्रिडा क्षेत्रात यश संपादन केले. या यशाबद्दल प्रविणचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच मुंबई व महाराष्ट्र हेड ऑफ डीसीसीबीआय क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य श्री भगवान तलवारे यांची देखील अभिनंदन केले. या यशाबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री भगवानजी बिडवे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे, जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे, प्रवक्ते श्री किरण मदने, संगमनेर नाभिक एकता महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री किशोर बिडवे सर, संगमनेर सलून असोसिएशन अध्यक्ष बाळासाहेब वाघ, श्री संजय जाधव, श्री रंगनाथ बिडवे, श्री गणेश बिडवे व इतर समाजबांधवांनी प्रविणचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *