
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिंदेवस्ती नवीन ता. कोपरगाव या शाळेतून इ. ७ वी पर्यंत शिक्षण घेवून पुढील शिक्षणासाठी ८ वी ला हायस्कूलला दाखल झालेली कु.कावेरी गोरख पाडेकर हिची राज्यस्तरीय बास्केटबॅाल संघात निवड झालेली आहे. या संघात ती अहमदनगर जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे.
कावेरीला पहिल्यापासून खेळाची आवड आहे.तिने आपल्या उच्च प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक प्रवासात तालुका क्रिडा स्पर्धेत लांब उडी मध्ये लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच विभागीय आयुक्तालय मार्फत ‘चला खेळू या’ (Let’s play) या स्पर्धेत याच क्रिडा प्रकारात कांस्य पदक मिळवले आहे. कावेरी उत्कृष्ट धावपटू देखील आहे. तिने धावणे (Running) मध्येही मोठ्या गटात (इ.६ ते ८) तालुकास्तरीय स्पर्धेत क्रमांक मिळवला आहे. तसेच तालुका पातळीवर निवड झालेल्या आपल्या शिंदेवस्ती नवीन शाळेच्या कबड्डी संघाचे नेतृत्व तिने केले आहे.
अशा या खिलाडूवृत्तीच्या कावेरीचे आणि तिच्या शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…!
