
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथे गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने भव्य गणेश उत्सव साजरा होणार असुन या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनाक ३१ आँगस्ट रोजी सायं. ५ वा.श्रींची स्थापना केली जाणार आहे.रात्रि ८ वा साईकथाकार ह.भ.प.बाळकृष्ण सुरासे यांचे प्रवचन होणार आहे. दि १ सप्टेंबर २०२२ रोजी शारदा इग्लिश मेडीअम स्कूल, सौमय्या विद्या मंदिर साकरवाडी यांच्या वतिने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२ सप्टेंबर २०२२ रोजी पिक्चर अभी बाकी है विनोदी नाटक,३ सप्टेबर २०२२ रोजी तन मराठी मन मराठी आँक्रेस्ट्रा,
४ सप्टेबर २०२२ रोजी कोमल पाटोळे यांचा कार्यक्रम, ५ सप्टेंबर २०२२ रोजी चल लव कर विनोदी नाटक,६ सप्टेबर २०२२ लावण्यांची लावण्यवती आँक्रेस्ट्रा ,
७ सप्टेंबर २०२२ रोजी जल्लोष अप्सरांचा,
८ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेम करा जपून विनोदी नाटक तर ९ सप्टेंबर २०२२ रोजी विसर्जन मिरवणूक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष सुहास गोडगे ,प्रविण विभूते उपाध्यक्ष, बी. एम. पालवे सरचिटणीस असुन कार्यवाहक कमिटी बी. एस.आर. कराळे संदिप क्षीरसागर. अरुण बोरनारे (खजिनदार ) रविंद्र भोकरे (सहखजिनदार),मच्छिंद्र मुरार,निलेश संत , रवि मखरे शिरिष कुलकर्णी, गोरख विंचु आप्पा वाणी, . संजय ठाकुर . प्रशांत पाटील ,संदिप मारकली. प्रदिप काळे . सुनिल बावीस्कर सुनिल संसारे दिलीप निकम, प्रकाश जाधव, आबासाहेब बारहाते,दत्ता शेलार, दिनेश गुप्ता, रामभान गायकवाड , सौदागर कुलाल, श्रीधर घमाळ, संतोष तबरेज नारायण वाळुंज,संजय टेके,अशोक निळे, आलेश निळे,योगेश चव्हाण. गणेश पाटील अशी असुन गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे अशी माहिती बी.एम.पालवे यांनी दिली आहे.
