श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान, कोपरगावला पाणिपतकार विश्वास पाटील यांची भेट आणि दर्शन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान,कोपरगाव येथे पाणिपतकार विश्वास पाटील(भा.प्र.से.) त्यांचे समवेत श्री रामनवमी उत्सव समिती शिर्डी चे अध्यक्ष व शिवसेना नेते श्री.कमलाकरजी कोते,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्री.संतोषजी खेडलेकर यांनी सदिच्छा भेट देत सोमेश्वर महादेव पुजा आणि दर्शन घेतले आहे…
सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने मानाची टोपी, उपरणे,श्रीफळ आणि प्रसाद देवून स्वागत सन्मान करण्यात आला आहे…


या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी (बाळासाहेब) पाटील,व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.मंगेशजी पाटील,श्री.महावीरजी शिंगी,श्री.जयंतजी विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांतजी घोडके,देवस्थानचे पुजारी श्री.नंदूजी शेंडे (गुरव),सोमेश्वर भक्त सौ.व श्री.संदिपजी नागरे,श्री.दिनेशजी दारुणकर,लोक स्वराज्य आंदोलनाचे श्री.नितीनजी पोळ,श्री.शरदजी ञिभुवन,श्री.राजेंद्रजी बागुल यांचे सह सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त उपस्थित होते…
पाणिपतकार विश्वास पाटील यांनी श्रीमंत महामहीम पवार सरकार यांचे धार संस्थानचे महान कार्य या संदर्भात माहिती सांगत “हर हर महादेव” या शिवाच्या उपासनेच्या घोषणेतून राजे-महाराचे सैन्यात एक उत्साह आणि आत्मविश्वास संचारत असल्याचे सांगत “उत्तम व्यवस्थापन…भाविक पुजन शुभेच्छा ” असा अभिप्राय सोमेश्वर महादेव देवस्थानचे अभिप्राय नोंदवहीत नोंदविला आहे…
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे माध्यमातून होणारा जिर्णोद्धार,वार्षिक उत्सव आणि विविध उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुशांतजी घोडके यांनी देवून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *