सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजच्या कॅडेटसचे कोपरगांवातुन शानदार संचलन...
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या छात्रांनी कोपरगांव मधिल आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा दरम्यान कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने शानदार संचलन केले, व नंतर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांचे प्रमुख उपस्थित एअर रायफल्स द्वारे शहिद जवानांना सलामी दिली. तसेच श्री कोल्हे, माजी सैनिक संघटना व इतर यांनी अमर जवान स्मारकावर पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली अर्पित केली.
२६ जुलै, १९९९ रोजी भारतीय लष्करानं पाकीस्तानी घुुसखोरांना पळवुन लावत कारगिल मधिल टायगर हिलसह लष्कराच्या सर्व चौक्यांवर कब्जा मिळविला. तब्बल ६० दिवस चाललेल्या या युध्दात भारताचा विजय झाला. तेव्हा पासुन २६ जुलै हा दिवस कारगील विजय दिवस म्हणुन भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याच अनुषंगाने संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअरच्या छात्रांमध्ये राष्ट्रप्रेम जागृती निर्माण व्हावी, जे जवान शहिद झाले, त्यांच्या प्रती कायम आदरयुक्त भावना असावी, व शहिद जवानांकडून कायम देश वासीयांनी प्रेरणा मिळावी, याच हेतुने सैनिकी स्कूलच्या पुढाकरातुन हा भावस्पर्शी कार्यक्रम ठरला.
यावेळी श्री सुमित कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांचे प्रती आदर व्यक्त केला. सदर प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे, उपाध्यक्ष श्री मारूती कोपरे, माजी सैनिक श्री प्रकाश राणा, श्री विजय भास्कर, श्री खिलारे एस.डी., श्री मुरडणर एन.बी. श्री मुळेकर व्ही. एच., श्री कोल्हे ए.एम., स्वच्छता दुत श्री सुशांत घोडके, उपप्राचार्य के. एल. दरेकर, श्री पांढरे एस. वाय. श्री जिरे के.पी. आदी उपस्थित होते.

फोटो ओळी: संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या वतीने कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे, तसेच माजी सैनिक उपस्थित होते.
