सहकार क्षेत्रातील सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे कारखान्याची निवडणूक राज्यात ऐतिहासिक ठरली:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

पाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा:- विवेक कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना आदरांजली वाहताना ज्येष्ठ सभासद ,पार्लमेंट बोर्ड व कारखान्याच्या हितचिंतकांनी पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध केली. 21 जागेसाठी फक्त 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले ही बाब इतिहासात नोंद करणारी ठरली ‌. स्व. शंकरराव कोल्हे यांनी कारखाना उभारणीपासून शेतकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून सातत्याने कोपरगाव तालुक्याचा विकास कसा होईल हे ध्येय धोरण ठेवले‌. त्यांनी केलेला पाट पाण्याच्या संघर्ष देखील विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागेल. 2005 साली समन्वय वाटप कायद्यात आपलं हक्काचं पाणी जायकवाडीला गेलं. नुकतंच येवल्याच्या चाळीस गावांना देखील आपल्या दारणा धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत झालं. गोदावरी उजवा व गोदावरी डाव्या कालव्यावर कोपरगाव तालुक्यातील शेती अवलंबून आहे. आज जर आपण पाण्यासाठी भांडलो नाही तर शेती अडचणीत येईल आणि पर्यायाने कारखानदारी देखील अडचणीतील त्यामुळे पाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे छत्रपती लॉन्स मध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या संचालक मंडळांचा सत्कार समारंभात बोलत होते.


यावेळी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, माजी उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, चंद्र पंढरी पतसंस्थेचे संस्थापक उत्तमराव औताडे, रामनाथ चिने, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब दवंगे, विश्र्वास महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बाराहाते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र कोळपे, मनिष गाडे, विलास वाबळे ,विलास माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, त्रिंबक सरोदे, सौ उषाताई औताडे,सौ सोनिया पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, संजय औताडे, माजी संचालक अशोक औताडे आप्पासाहेब औताडे, निखिल औताडे, शंकर औताडे, कचेश्वर रांधव, निवृत्ती औताडे ,अमोल औताडे ,अजित नवले ,काकासाहेब शिंदे, जगन्नाथ औताडे, नवनाथ औताडे ,सुखदेव भालेराव, इंद्रभान खुरसणे, रमेश रोहमारे, विलास रोहमारे अदी उपस्थित होते.संचालक बाळासाहेब वक्ते यांनी गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याच्या बाबतीत नेहमीच आपल्या तालुक्यावर अन्याय होत असल्याचे सांगत धरणे शंभर टक्के भरलेले असताना देखील तीनच आवर्तने झाली ही दुर्दैवी बाब आहे. आता जायकवाडी धरण भरले जरी असली तरी भविष्यासाठी संघर्ष हा आटळ आहे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पाराजी औताडे व सौ उषाताई संजय औताडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक डी पी औताडे यांनी केले तर आभार अशोक औताडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *