वनिता मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वंदना चिकटे (अध्यक्षा), शैला लावर (उपाध्यक्षा), वृषाली किर्लोस्कर (सचिव) यांची निवड करण्यात आली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी.भविष्यकाळाचा विचार न करता,दुखः कष्टी न होता केवळ वर्तमानात जगण्याची सवय प्रत्येक महिलेने अंगीकारावी.आज समाजातील विविध क्षेत्रात महिला उंच भरारी घेत आहे. त्यांचे कार्य समाजाला आदर्शवत व कौतुकास्पद आहे असे गौरोद्गार भाजपच्या प्रदेश सचिव ,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले.वनिता मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वंदना जगमोहन चिकटे (अध्यक्षा),शैला बाळकृष्ण लावर (उपाध्यक्षा)वृषाली विनीत किर्लोस्कर (सचिव) यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वनिता महिला मंडळाच्या नूतन पदाधिकार्यांना कामाची मोठी संधी असून भविष्यात मंडळाला कुठल्याही प्रसंगी गरज भासल्यास मी भक्कम साथ देऊन निश्चित सहकार्य करील अशी ग्वाही यावेळी माजी आमदार कोल्हे यांनी दिली.
येथील वनिता महिला मंडळाच्या नूतन कार्यकारणी पदग्रहण समारंभ व दहावी बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थाचा गुणगौरव समारंभ प्रसंगी सौ. कोल्हे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
सदर कार्यक्रम ब्राम्हण सभा मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून समता ग्रुपच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे होत्या. मंडळाच्या विविध पदाधिकारी यांनी यावेळी पदग्रहण केले.यावेळी सुधाभाभी ठोळे,संगीता मालकर,डॉ. वर्षा झंवर,विमलताई पुंडे,रेणुका नाईक ,अॅड.श्रद्धा जवाद ,अॅड .स्मिता जोशी, भावना गवांदे,रुपाली गुजराथी,राजश्री जाधव, डॉ. दिपाली आचारी,सपना मोरे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात नूतन अध्यक्षा वंदना जगमोहन चिकटे म्हणाल्या, मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “वनिता मंडळाची भरारी” हे मासिक संपादन करण्यात येणार आहे.मंडळाच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक व्याख्याने, मुलीचे जन्माचे स्वागत,कोजागिरी, वासंतिक रसपान आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. सामाजिक बांधिलकीतून पोलीस अधिकारी, कारागृहातील कैदी,पत्रकार यांच्यासह शासनाच्या विविध अधिकारी, कर्मचारी यांच्या राखीबंधनाचा कार्यक्रम यावर्षी घेण्यात येणार आहे. महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना लाड यांनी तर आभार शैलजा लावर यांनी मानले.
वनिता मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निवड झालेली नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे -वंदना जगमोहन चिकटे (अध्यक्षा),शैला बाळकृष्ण लावर (उपाध्यक्षा)वृषाली विनीत किर्लोस्कर (सचिव)आरती सचिन महाजन(सहसचिव)वैदेही विराज किर्लोस्कर(खजिनदार)विद्या सुनील गोखले(सहखजिनदार) ,स्वाती मुळे ,हर्षदा पटवर्धन ,मीना भालेराव,रंजना कुलकर्णी,विशालाक्षी शालिग्राम ,माधवी नेने (सदस्य) श्रीमती नलिनी पटवर्धन ,रजनीताई गुजराथी, पुष्पलता सुतार ,शैलजा रोहोम (सल्लागार समिती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *