ब्रम्हलिन संत रामदासीबाबा कोकमठाण’ तीर्थक्षेत्री गुरुपौर्णिमा…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी कार्यस्थळावर गुरुपौर्णिमा उत्सवानिमीत्त अंचलगांव येथील हभप जालींदर महाराज शिंदे यांचे किर्तन १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांनी कोकमठाण पंचक्रोशीत गोदावरी नदीकाठी तपश्चर्या केली. रामदासीबाबा भक्त मंडळ या स्थानावर ३२ वर्षापासुन पुण्यतिथी उत्सवासह अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करतात.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमीत्त रामदासी बाबांच्या मुर्तीस सौ. सुवर्णा व भास्कर रावसाहेब लोहकणे यांच्या हस्ते सकाळी ७ ते ९ यावेळेत लघुरूद्र अभिषेक होत आहे. या कार्यक्रमाचे पौरोहित्य पदमाकर मुळे गुरुजी करणार आहे. लघुरुद्र, किर्तन आटोपल्यावर महाप्रसाद वाटप होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, किर्तनास, कोकमठाण, संवत्सर, सडे, शिंगवे, भोजडे, दहेगांव, गोधगोव, कान्हेगाव, वारी, पुणतांबा, कोपरगाव बेट पंचक्रोशीतील भजनी मंडळी साथ करत आहे. प्राचीन इतिहासकालीन हेमाडपंथी महादेव मंदिराशेजारी ब्रह्मलीन संत रामदासी बाबा मंदिर आहे. या स्थानावर असंख्य इतिहास प्रेमी, पर्यटक, संशोधक संत महंत भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेतात. कच देवयानी अख्यान मधील देवयानी लक्ष्मी माता मंदिरही कोकमठाण तीर्थक्षेत्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *