वयाच्या १९ व्या वर्षीच
विध्यार्थी होताय कमावते…
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या पुढाकाराने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कोल्ब्रो ग्रुप या कंपनीने घेतलेल्या परीसर मुलाखतींचा निकाल कंपनीने नुकताच जाहिर केला असुन यात सिव्हिल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील १७ नवोदित अभियंत्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे. या विध्यार्थांचा निकाल येणे अद्याप बाकी आहे, तरी सुध्दा त्यांच्या हातात नोकरीच्या नेमणुकीचे पत्र प्राप्त झाले आहे, संजीवनीच्या प्रयत्नामुळे शेकडो विध्यार्थी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कमावते होत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की कोल्ब्रो ग्रुप ही एक प्रकल्प व्यवस्थापन कंपनी आहे. या कंपनीद्वारे महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा व महानगारपालिकांसाठी जीआयएस आधारीत मालमत्ता कर मूल्यांकण सर्वेक्षण आणि मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीवर काम केल्या जाते. आगामी काळात अधिकचे अभियंते या कंपनीला लागणार आहेत.
कोल्ब्रो ग्रुपने निवडलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये मयुर संजय पवार, शुभम दहिफळ, अदित्य राज, यशराज धनेधर, धिरज कुमार, मेघनाथ कुमार, अमित कुमार, सोहन कुमार, विशाल शर्मा, सोनु कुमार, सोनुकुमार ठाकुर, रितेश कुमार सिंघ, रवितोश कुमार, प्रथमेश घुगरकर, राहीत कौतिक घोगडे, अविष्कार गायकवाड आणि विकास अबासाहेब मिंद यांचा समावेश आहे. त्यांच्या अंतिम परीक्षेचा निकाल हाती मिळताच ते सर्व सेवेत रूजु होणार आहेत.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व विध्यार्थी व त्यांचे भाग्यवान पालक यांचे अभिनंदन करून विध्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद , विभाग प्रमुख प्रा. योगेश जगताप, प्रा. प्रताप आहेर उपस्थित होते.

फोटो ओळी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या समवेत कोल्ब्रो ग्रुप कंपनीने निवड केलेले संजीवनी पाॅलीटेक्निकचे विध्यार्थी. यावेळी प्रा. मिरीकर, प्रा. सय्यद, प्रा. जगताप व प्रा. आहेर उपस्थित होते.
