संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या सायन्स शाखेचा विद्यार्थी सार्थक जोशी बारावी परिक्षेत ९२.५० टक्के गुण मिळवून सायन्स शाखेत महाविद्यालयात प्रथम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
येथील संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या सायन्स शाखेचा विद्यार्थी सार्थक वीरेंद्र जोशी (संवत्सर) हा बारावी परिक्षेत ९२.५० टक्के गुण मिळवून सायन्स शाखेत महाविद्यालयात प्रथम आला याबद्दल त्याचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे वतीने त्याचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार केला व भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या सत्कारसमयी प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे, विनोद शेटे, सागर निकम, अंदोरे सर उपस्थीत होते. चि. सार्थक हा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी वीरेंद्र जोशी यांचे चिरंजीव तर पत्रकार महेश जोशी, मयूर जोशी यांचे पुतणे आहेत. सार्थकच्या यशाबद्दल भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी त्याची आई श्वेता जोशी, सुप्रिया जोशी, सर्वेश जोशी, पद्मजा जोशी ,सोहम जोशी, सर्वज्ञ जोशी आदी उपस्थित होते. सार्थक च्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *