संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १३ विध्यार्थ्यांची जाॅनसन लिफ्टस् मध्ये निवड:- श्री अमितदादा कोल्हे…

Uncategorized

अंतिम निकाला अगोदरच विध्यार्थ्यांच्या हातात नोकरीचे पत्र…
कोपरगांव प्रतिनीधी:-
संजीवनी के.बी पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत जाॅनसन लिफ्टस प्रा. लिमिटेड या कंपनीने विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या १३ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. या विध्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जुनमध्ये होणार आहे, तरी सुध्दा त्यांच्या हातात अंतिम निकाला अगोदरच नोकरीचे पत्र प्राप्त झाल्याने निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये आनंद झाला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे माजी मंत्री, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी सुमारे ४० वर्षांपूर्वी संजीवनी पाॅलीटेक्निकची स्थापना करून तांत्रिक शिक्षणाची सुरूवात केली. अनेक वर्षे अनेक उद्योगांना तांत्रिक कामासाठी योग्य हात मिळत नव्हते तर अनेक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या नवोदित अभियंत्यांच्या हातांना काम मिळत नव्हते. मात्र ही विसंगती दुर करण्यासाठी कै. कोल्हे यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग जगताला नेमके कोणत्या पध्दतीचे ज्ञान असलेले अभियंते पाहीजे यासाठी विभाग निहाय अभ्यास करून उद्योग जगताला अभिप्रेत असलेले अभियंते तयार केल्यामुळे पाहीजे त्या विध्यार्थ्याला नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवन देण्यासाठी संजीवनी पाॅलीटेक्निकने ग्रामिण महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे.
अलिकडेच संपुर्ण भारतात विविध ठिकाणी कारखाने असलेल्या, लिफ्ट आणि एस्केलेटर (माॅल मध्ये एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी वीजेवर चालणारे यंत्र) बनविणाऱ्या, चैन्नई येथे मुख्यालय असलेल्या भारतातील आघाडीच्या जाॅनसन लिफ्टस् प्रा. लि. या कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १३ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे. यात निखिल सयाजी कोथवाल, अभिराज अजय वाबळे, विजय मानिक साळुंके , प्रसाद अरविंद चव्हाण, योगेश दिलीप रोकडे, अजय नानासाहेब मोरे, ऋषिकेश सोपान मगर, वैभव रंगनाथ आवारे, देवेंद्र राजेंद्र साळवे, राहुल राजेंद्र काळे, अनुकांत सुरेंद्र गीते, ओमकार नारायण बडाख व श्रेयश अशोक वडणे यांचा समावेश आहे. हे सर्व विध्यार्थी ग्रामीण भागातील असुन त्यांना नोकरी मिळवुन दिल्यामुळे त्यांच्या पालकांनी संस्थेप्रती धन्यवाद व्यक्त केले आहे.
विध्यार्थ्यांच्या या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. योगेश जगताप उपस्थित होते.

फोटो ओळी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी जाॅनसन लिफ्टस प्रा. लि. कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विध्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *