
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कान्हेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे रामदास चौधरी व व्हा. चेअरमनपदी सुनिल काजळे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कान्हेगाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाकडून सत्ता हिसकावून घेत या सोसायटीवर आपला झेंडा रोवला आहे. या सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमन पदाच्या नावाची सूचना दीपक भाकरे यांनी मांडली सदर सूचनेस गोरख सांगळे यांनी अनुमोदन दिले व व्हा. चेअरमन पदाच्या नावाची सूचना गोपीनाथ भाकरे यानी मांडली त्या सूचनेला सोपान काळे यांनी अनुमोदन दिले. चेअरमन, व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी दीपक सावंत यांनी चेअरमन पदी रामदास चौधरी व व्हा. चेअरमनपदी सुनिल काजळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी लक्ष्मण चौधरी, दिनकर काजळे, देवचंद कडेकर, बंकटराव जगताप, मच्छिंद्र जगताप, जनार्दन जगताप, बबनराव सांगळे, अरुण भाकरे, दादासाहेब भाकरे, कडूबा खिलारी, राजेंद्र चौधरी, बाळकृष्ण ठाकरे, देवचंद काजळे, सचिव ज्ञानेश्वर मंचरे आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन रामदास चौधरी व व्हा. चेअरमन सुनिल काजळे यांचे माजी आमदार अशोकराव काळे व ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
