धारणगाव येथे संगीत दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी दि.२४ मे २०२२ ते ३१ मे २०२२ या काळात संगीत दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले असुन ह.भ.प.भागवताचार्य कविताश्रीजी साबळे (दिदी) यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथा संपन्न होणार आहे.राधा माधव श्रीमद् भागवत सेवा मंडळ, ग्रामस्थ धारणगांव, भजनी मंडळ, धारणगांव.ता.कोपरगाव यांच्या वतिने श्री विठ्ठल मंदिर, धारणगांव, ता. कोपरगांव, जि. अ. नगर या ठिकाणी हा कार्यक्रम होत असुन मंगळवार दि. ३१.५.२०२२ रोजी सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प. कविताताई साबळे (दिदी) यांचे काल्याचे किर्तन होईल.तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

या कथेसाठी गायक म्हणुन. ह.भ.प. योगेश सायखेडे,ह.भ.प सुनिल भगत आहे.श्रीक्षेत्र धारणगांव येथे संगीत दिव्य श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा भाविक-भक्तांच्या अनमोल सहकार्याने व भजनी मंडळाच्या परिश्रमातून संपन्न होत आहे. तरी भाविकांनी सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. तन, मन, धनाने सहकार्य करावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *