तहसील कार्यालय कोपरगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व राष्ट्रध्वजास मानवंदना दिली…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन कोपरगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याठिकाणी तहसीलदार श्री. योगेश चंद्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी पंचायत सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक दौलतराव जाधव, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस उपनिरीक्षक श्री नागरे, श्री बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, फकीरमामु कुरेशी, दिनकर खरे, वाल्मिक लहिरे, अशोक आव्हाटे, संदीप कपिले, बाळासाहेब रुईकर, रावसाहेब साठे, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, चंद्रशेखर म्हस्के, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, राजेंद्र जोशी, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, आकाश डागा आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *