
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२१/२२ च्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार (दि.२५) रोजी सकाळी १०.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व त्याच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.
मागील वर्षापासून संपूर्ण विश्वावर कोरोना संकट आले आहे. दुसरी लाट ओसरत असून संसर्ग देखील कमी होत असला तरी कमी झालेला कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये याची दक्षता घेवून नुकताच पार पडलेला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने नुकताच पार पडला आहे. २०२१/२२ च्या या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यावर व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी केले आहे.
