कोकमठाण तीर्थक्षेत्रावर समाजप्रबोधानकर सर्जेराव टेके यांच्या संतवाणीतून शौर्यगाथा शिवरायांची कथा प्रारंभ..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोकमठाण व ब्रहमलीन संत रामदासीबाबा यांच्या कर्मभूमीत त्यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमित्त वारी येथील समाजप्रबोधानकर हभप सर्जेराव महाराज टेके यांच्या सतवाणीतुन शौर्यगाथा शिवरायांची कथा कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.
या कथा सप्ताहात त्यांनी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजाचे मातृ पितृकुळ, शिवजन्म, शहाजीराजाचे स्वराज्यस्वप्न शिवरायांचा विवाह, शिवराज्याची शपथ, स्वराज्य नांदी, स्वराज्य विस्तार, स्वराज्यावरील पहिले संकट, किल्ले पुरंदर, फत्तेखानाशी झुंज यावर सविस्तर विवेचन केले आहे. या कार्यक्रमांसाठी अरुणभैया पगारे, तबला हभप सोपान महाराज तळेकर, अतुल महाराज शिंदे, वेषभूषाकार हभप दिलीप महाराज खळदकर याची साथ लाभत आहे. प्रत्यक्ष शिवकाळातील वेषभूषा सादर होत असल्याने कोरोना नियम पाळून उपस्थित भाविक त्याचा आनंद घेत आहेत. या कार्यक्रमाची सांगता सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी होत आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन रामदासीबाबा भक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

फोटोओळी:- कोपरगाव
वारी येथील समाजप्रबोधानकर हभप सर्जेराव महाराज टेके यांच्या संतवाणीतून शौर्यगाथा शिवरायाची कथा वेषभूने सादरीकरण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *