
कोपरगाव प्रतिनिधी:-
संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे,
प्रवास 45 दिवसाचा
नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात एका मुलीचा अकाली जन्म (नऊ महिने पुर्ण होण्याच्या आत प्रसूती होणे) सातव्या महिन्यात झाला. बाळाचे जन्माचे वजन फक्त 700 ग्रॅम,शरीराची पुर्ण वाढ व विकास आईच्या गर्भपिशवीत होण्या आधीच प्रसूती झाली. इतक्या कमी वजनाचे बाळ खुपच नाजुक होते. पुर्ण वाढ व विकास न झाल्याने स्वतंञ रित्या कोणतेही जीवन आवश्यक काम शरीर करु शकत नव्हते. बाळाला SJS Hospital च्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास ( ventilator)
देण्याची गरज पडली. जंतुसंसर्ग व रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास बाळ असक्षम होते. अचूक व वेळेवर केलेले उपचार ह्यामुळे बाळाची प्रकृती सुधारली. डिसजार्च वेळी बाळाचे वजन 1200 gm होते. ह्यासंबंधी बालरोग तज्ञ डाॅ अनंतकुमार भांगे, बालरोग विभाग कर्मचारी वर्ग, पॅथोलाॅजी लॅब प्रमुख श्री शरद अनारसे यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन नातेवाईकांना केले.
नवजात बालकांसाठी सर्व प्रकारचे आधुनिक उपचार पद्धती, व्हेंटिलेटर फोटो थेरपी , हे हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत व महात्मा फुले जन आरोग्य योजना याचाही लाभ नवजात बालकांना मिळत आहे.
बाळाच्या आईवडिल व नातेवाईकांनी हाॅस्पिटल वर विश्वास ठेवून सहकार्य केले.त्रासातून सुखरूप बाहेर आले ह्याचा द्विगुणीत आनंद नातेवाईकांनी व्यक्त केला.
देव तारी त्याला कोण मारी , हे देव मनुष्य रूपात आपल्यासोबत हाॅस्पिटल संस्थेचे च्या रुपात वावरतात हे नक्कीच खरे आहे !
