
कोपरगाव प्रतिनिधी:-
जगामध्ये ४३ देशात पाहिल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय अश्या BBC Tv च्या प्रतिनिधींनी आज देवळाली प्रवरा शहरास सदिच्छा भेट दिली.
मुंबई स्थित कार्यालयातील बीबीसी टीव्हीचे प्रतिनिधी मा. प्रवीण ठाकरे साहेब आणि कॅमेरामन मा. मयूर भुजबळ साहेब यांनी आज देवळाली प्रवरा येथे भेट दिली असता येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी त्यांचे देवळाली प्रवरा येथील शिव छत्रपती निवास या ठिकाणी देवळाली शहराचे व ढुस परिवाराचे वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
