
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांवातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ब्राह्यण सभा.कोपरगांव यांच्या विदयमाने नुकताच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं कला-क्रीडा महोत्सवात चित्रकला,रांगोळी व बुध्दीबळ स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.त्यातील विजयी स्पर्धेकांचा पारीतोषिक वितरण समारभ नुकताच ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ब्राह्यण सभेचे माजी अध्यक्ष श्री.सुधाप्पा कुलकर्णी होते.अहमदनगरचे गुन्हे अन्वषेण विभागाचे निवृत्त अप्पर आयुक्त सुभाष महाजन यांच्या शुभहस्ते पारीतोषिक वितरण झाले.
माजी नगराध्यक्ष श्री.संजय सातभाई यांचा ६१व्या वाढदिवसांच्या निमित्तानं ब्राह्यण सभेच्या वतीने पेशवाई पगडी घालुन तर ब्राह्यण समाज महीला मंडळाच्या वतीने ६१दिवे ओवाळुन सत्कार करण्यात आला,
कोपरगांवच्या माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री.प्रसाद नाईक,श्री.पिंपळवाडकर या प्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी केले.भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.प्रमुख पाहुणे अहमदनगरचे सुभाष महाजन यांनी ब्राह्यण सभेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी ब्राह्यण सभेच्या विविध उपक्रमला भरभरुन मदत करु असे सांगितले.यावेळी ब्राह्यण सभेचे बांधकाम समितीचे प्रमुख प्रसाद नाईक यांनी मंगल कार्यालय अंतिम टप्प्यात आले असुन जानेवारीत सर्वासाठी उपयोगात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुधाप्पा कुलकर्णी यांनी समाज बांधवांनी ब्राह्यण सभेच्या कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन करुन कोपरगांवात आपल्या समाजाने स्वतःचे मंगल कार्यालय उभे केले याचा मला निश्चित अभिमान वाटतो असे स्पष्ट केले.
या प्रसंगी कला-क्रीडा स्पर्धात विजयी झालेल्या, यश संपादन केलेल्या खेळाडु, विदयार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र देवुन सन्मान करण्यात आला.रांगोळी व चित्रकला मध्ये सुंदर प्रदर्शन केलेले श्री.कीशोर भोसले यांना विशेष पुरस्कार देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचेचे परीक्षक श्री.अनिल अमृतकर,श्री.अतुल कोताडे,श्री.रविंद्र कांबळे,श्री.निर्मळ ए.बी,बुध्दीबळ सर्कलचे नितीन सोळसे व रमेश येवले,महेश थोरात इ.स्मृतिचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्र संचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले. स्पर्धाचे संयोजन संघटक महेंद्र कुलकर्णी,सहसचिव संदीप देशपांडे,अजिंक्य पदे,सदा धारणगांवकर यांनी केले. आभार प्रदर्शन संजीव देशपांडे यांनी केले. ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन महाजन,उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,कार्यकारीणी सदस्य श्री. वसंतराव ठोंबरे,श्री.अनिल कुलकर्णी डाॕ.मिलींद धारणगांवकर,अॕड.सौ.श्रध्दा जवाद,सौ.वंदना चिकटे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी ,संघटक गौरीष लव्हरीकर आदी सह बहुसंख्य समाजबांधव,विद्यार्थी या कार्यक्रमाला सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.या प्रसंगी दिपावली मेळाव्या अंतर्गत विविध व्यावसायिक उपयोगी स्टाॕल समाज बांधवांना उपलब्ध करुन देण्यात आले होते.या ठीकाणी समाज बांधवानी भेट देवुन दिपावली सणाची खरेदी केली.
कला/क्रीडा महोत्सव विविध स्पर्धाचा निकाल
बुध्दीबळ स्पर्धा
शालेय गट(इ.५ते१०वी)
प्रथम- साईश शिंदे.
व्दीतीय-ओंकार लोखंडे
तृतीय-वरद श्रीकांत जोशी
उत्तेजनार्थ-लावण्या भडकवाडे
-दिश्ना खुबाणी
खुला गट
प्रथम-अथर्व थोरात
व्दीतीय-संकेत गाडे
तृतीय-आदित्य भडकवाडे
उत्तेजनार्थ-यश बंब
-प्रमोद वाणी
चित्रकला स्पर्धा
लहान गट(इ.५ते७वी)
प्रथम- कु.जानव्ही गणेश आतकरे.
व्दीतीय-ज्ञानेश्वरी किशोर तलबे
तृतीय-सोहम लक्ष्मीकांत मांडगे
उत्तेजनार्थ-वरद नचिकेत तारोडी
-सोहम योगेश कहार
मोठा गट(इ.८ते१०वी)
प्रथम-श्लोक अतुल कोताडे
व्दीतीय-स्वानंद मनोज जोशी
तृतीय-साईशा मुकुंद इंगळे
उत्तेजनार्थ-श्रृती दादा जाधव
-नेहा रविंद्र भोसले
खुला गट
प्रथम-कु.प्राजक्ता दिलीप राजेभोसले
व्दीतीय-ओंकार आनंदा मोरे
तृतीय-स्नेहल अर्जुन आव्हाड
रांगोळी स्पर्धा
लहान गट(इ.५ते७वी)
प्रथम- वरद नचिकेत तारोडी.
व्दीतीय-संस्कार राजेंद्र केकाण
तृतीय-सोहम लक्ष्मीकांत मांडगे
मोठा गट(इ.८ते१०वी)
प्रथम-नेहा रविंद्र भोसले
व्दीतीय-साईशा मुकुंद इंगळे
तृतीय-श्रध्दा रमेश दिवेकर
उत्तेजनार्थ-कस्तुरी योगेश सोनवणे
-तारामती रमेश जगदाळे
खुला गट
प्रथम-कु.प्राजक्ता दिलीप राजेभोसले
व्दीतीय-सौ.रीमा सुयोग काले
तृतीय-सुनिता संजय बिडवे.
उत्तेजनार्थ-शिल्पा नरेंद्र नेने -जोत्न्सा अभिजित कुलकर्णी
