
कोपरगाव प्रतिनिधी:- आज टाकळी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील 5% दिव्यांग निधीतून पंचवीस लाभार्थी दिव्यांगांना किराणा वाटप
टाकळी ग्रामपंचायत च्या पाच टक्के निधीतून दिव्यांगांसाठी दिवाळीच्या निमित्ताने पंचवीस लाभार्थ्यांना किराण्याचे वाटप ग्रामपंचायतचे सरपंच संदीप भाऊ देवकर उपसरपंच संजय भाऊ देवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला

याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत मा सभापती सुनील भाऊ देवकर माजी सरपंच राहुल देवकर सुनील पाईक गावचे जेष्ठ सुभाषराव देवकर छगनराव देवकर बाबासाहेब मालकर ग्रामपंचायत सदस्य सुनील रामदास देवकर नारायण बर्डे भागिनाथ शेलार पोलीस पाटील राजेंद्र देवकर गणेश देवकर ग्राम विकास अधिकारी विजय पाटील ग्रामपंचायत कर्मचारी भागवत देवकर गोरख डिबरे अमोल भुजबळ व दिव्यांग लाभार्थी आणि ग्रामस्थ
