
कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव विधानसभा मतदार संघात पंतप्रधान कल्याण व राज्य शासन अंतर्गत देण्यात येणारा शिधा स्वस्त धान्य दुकानदारांना उशीरा दिला जातो परिणामी स्वस्तधान्य लाभार्थी व दुकानदार यांच्यात विनाकारण वाद वाढत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणांत असुन त्यांना हा शिधा दरमहा १० तारखेच्या आत वितरीत करण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनामुळे अनेक मजुरांची उपासमार होत आहे. या स्वस्त धान्य लाभार्थ्यांना वेळेवर स्वस्त धान्य मिळत नाही. बहुसंख्य रेशनदुकानदार हे महिन्यांच्या अखेरीस स्वस्त धान्याचे वितरण करतात त्यामुळे असंख्य लाभार्थी या हक्काच्या योजनेपासुन वंचित रहात आहेत. तेंव्हा शासनाने पंतप्रधान कल्याण व राज्य शासन अंतर्गत देण्यांत येणारा शिधा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना दरमहा १० तारखेच्या आत देणेबाबत आदेश करावेत. या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविले आहे.
