कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- शिक्षण घेत असतांना विद्यार्थी दशेत संघटनेच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला जातो. राजकारणातील अनेक दिग्गज राजकारण्यांची शिक्षण घेत असतांना संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा त्यांना पुढील राजकीय जीवनात फायदा झाला हे जरी खरे असले तरी विद्यार्थी दशेत संघटनेच्या माध्यमातून काम करत असतांना शिक्षण देखील अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे संघटनेत काम करतांना शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू देवू नका असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांना दिला.
कोपरगाव येथे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदवितरण समारंभ नुकताच आमदार आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संघटनेच्या विविध पदावर करण्यात आलेल्या निवडीमुळे आपली जबाबदारी वाढली आहे याची जाणीव ठेवा. पदाधिकारी म्हणून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष होणार नाही व शिक्षणात देखील मागे पडणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवितांना आपण करीत असलेल्या मागण्या किंवा करीत असलेले आंदोलन कायद्याच्या चौकटीत बसतात का? याचा विचार करा. तुमच्या मागण्या रास्त असतील तुम्हाला नक्की न्याय मिळेल. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून प्रथम शिक्षणाला प्राधान्य देवून आपली समाजकारणाची व राजकारणाची आवड जोपासावी असा बहुमोल सदेश दिला.नूतन पदाधिकाऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार असल्याचा निश्चय यावेळी केला.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार, नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, फकीरमामु कुरेशी, रमेश गवळी, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, मनोज कडू,प्रा.अंबादास वडांगळे, जावेद शेख, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, रावसाहेब साठे, विकास बेंद्रे, सचिन परदेशी, सलीम पठाण, निखिल डांगे, योगेश नरोडे, विजय त्रिभुवन, एकनाथ गंगूले, दिनेश पवार, फिरोज पठाण, संदीप सावतडकर आदींसह विद्यार्थी संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ -१) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदवितरणप्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे समवेत मान्यवर व विद्यार्थी संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी.


फोटो ओळ -२) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदवितरणप्रसंगी आमदार आशुतोष काळे समवेत मान्यवर व विद्यार्थी संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी.
