
कोपरगाव प्रतिनिधी:- लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्यातर्फे दि.२२ ऑगस्ट रोजी श्री. साईबाबा वारकरी शिक्षण संस्था ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई च्या महिला सदस्यांनी याप्रसंगी राख्या बांधल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेतील विद्यार्थी व लायन माधुरी ताई शिंदे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यानंतर क्लब च्या महिला सदस्यांनी श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे महंत श्री स्वामी काशीकानंद महाराज यांचे पूजन केले व त्यांना राखी बांधली. यानंतर सर्व महिला सदस्यांनी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्व लायन्स आणि लिओ सदस्यांना राखी बांधली.


यावेळी क्लब तर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच लिओ क्लब शिर्डी साई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन व वही यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे महंत श्री स्वामी काशीकानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले व या कार्यक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला असेही नमूद केले.यावेळी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई चे अध्यक्ष ला. प्रा. सागर कुलकर्णी, सचिव ला. महेश वैद्य, खजिनदार ला. वसंत घुगे, माजी अध्यक्ष ला. वाल्मीक तुरकणे, ला. सौ.मनीषा वैद्य, ला. सौ. अनुजा कुलकर्णी, ला. सौ. नंदा घुगे, ला. सौ. माधुरी शिंदे, ला. सौ. मनीषा चौधरी, ला. सौ. शोभा लवांडे इत्यादी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व लिओ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
