पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चिमुकल्या आराध्याचे कौतुक…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-स्वातंत्र्य दिनी अडीच वर्षीय कु.आराध्या जयराम गावित या चिमुकलीने भारतातील संपूर्ण राज्याच्या राजधान्या केवळ ४३ सेंकदात सांगून ३६० बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली.

त्याबद्दल नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कु.आराध्या जयराम गावितचे पुष्पगुच्छ देत कौतुक केले. तसेच तिला भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी जयराम गावित, अनिता गावित, राहुल बनसोडे , संजय वाघ, रामेश्वर साबळे, अक्षय गांधी, सुयोग वाघ, उमेश भोये, अमोल शिरसाठ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *