कोपरगाव राष्ट्रवादीचा लाव रे तो व्हिडिओ म्हणायची वेळ येवू देऊ नका:- आरिफ कुरेशी…

कोपरगाव

आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्यांचे पहावे वाकून अशी राष्ट्रवादीची गत:- आरिफ कुरेशी

कोपरगाव प्रतिनिधी:-
व्यक्तीगत पातळीवर युवकाचे एका हॉटेल चालकाशी झालेले वाद-विवादाचा आधार घेऊन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्याबद्दल घसरू पाहणाऱ्या राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांचे कोल्हे कुटूंबाकडून कालपर्यंत खाल्लेले अद्याप दातातून निघाले नसून त्यांनी बालिश लोकप्रियता मिळवण्यासाठी नाहक धडपड करू नये असा खोचक सल्ला नवनियुक्त उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी नवाज कुरेशी यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या चौकातील मारामारीच्या भाषेमुळे त्यांची जनमानसात झालेली कोंडी व शहराच्या पाणी प्रश्नावर आमदार आशुतोष काळें यांनी केलेली फसवणूक उघड झाल्या मुळेच विरोधक बेतालपणiची वक्तव्य करून नवाज कुरेशी यांना बोलके बाहुले करून वापरले जात असून स्वतःची पाठ स्व:तचं थोपटून घेत आहेत असेही ते म्हणाले.

             श्री. अरिफ कुरेशी पुढे म्हणाले की, एखाद्या युवकांचे वैयक्तिक पातळीवर कुणाशी वादविवाद झाले तर ते अगदी नेत्यांचे संस्कार संस्कृती काढण्यापर्यंत मजल जाणारे नवाज कुरेशी यांना  कोल्हेच्या संस्कृतीचा  विसर पडलेला दिसतो..   विवेकभैय्या कोल्हे यांच्या धडाकेबाज कामाच्या जोरामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते आकांड तांडव करणार यात काही नवल नाही.
            पक्षीय संस्कृतीचा विचार करायचा झाला तर दीड महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीचा एक वरच्या फळीतल्या पदाधिकाऱ्याचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण सर्वत्र प्रसारित झाले होते.  आजही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एकमेकाला मोठ्या चवीने हे व्हिडिओ दाखवतात हे नवाज कुरेशी विसरले असावेत.   संस्कारांचीच तुलना करायची असल्यास असे एक नाही अनेक व्हिडिओ तुमच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेसमोर ठेवता येऊ शकतात व त्या कृत्याच्या पाठीमागे तुमचे नेतेच आहेत का ? असाही प्रश्न उभा राहतो.  कुणाच्या पक्षाचे व नेत्यांचे काय हीन पातळीचे संस्कार आहे हे नागरिकांना चांगले कळलेले आहे. , अशा घटनांचे संदर्भ आमदार काळेंच्या संस्काराशी जोडून बोलता येऊ शकते मात्र कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध राजकीय दृष्टीने जोडणे कोल्हे कुटूंब करत नाही.कुठल्या गोष्टीचा संबंध कुठे जोडावा हे प्रगल्भ नेत्याचे लक्षण असते.तुमच्या उपशहराध्यक्षाच्या प्रकारात राजकारण करायचे असते तर करता आले असते परंतु कोल्हे कुटूंब कुणाच्या घरापर्यंत राजकारण करत नाही हे सर्वांनाच माहीत आहे.  कोल्हे कुटूंबाकडून नवीन युवकांना चांगल्या कामाची प्रेरणा दिली जाते, त्यांचे आयुष्यात माती कालवण्याचे पातक कधीही केले जात नाही., ती त्यांची संस्कृती नाही हे नवाज कुरेशी व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यानी अनुभवलेले आहे.
        नौटंकी काय असते याचे उत्तम उदाहरण तुम्ही आहात कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणी काय केले हे सर्वांना सांगितले तर तुमचे पदही तुमचे नेते ठेवणार नाहीत त्यामुळे समझने वाले को इशारा काफी असे सणसणीत प्रतिउत्तर आरिफ कुरेशी यांनी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *