महिलांची खिल्ली उडविणे नगराध्यक्ष हा तर तुमचा पिंडच:-स्वप्निल निखाडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे यांनी बोलताना कोपरगांव मतदार संघाच्या प्रथम माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्या बद्दल बोलताना या महिलाबद्दल तिरस्कराची भाषा वापरुन खिल्ली उडविली होती या गोष्टीवरुन भाजपाच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारुन त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. वरील गोष्ट घडल्यानंतर परत एकदा माजी महिला आमदारांबद्दल गरळ ओकली त्यांनी कोणताही निधी कोपरगांव नगपरिषदेला मिळवुन दिला नाही असे धडधडीत जनतेला खोटे सांगितले यावरुन वहाडणे यांची महिलांविषयीची व्देष भावना दिसुन येते. स्वत: च्या व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी धडधडीत खोटे बोलणे हि तुमची प्रवृत्ती झालेली आहे.
महिलांबद्दलचे आपले विचार काय आहे हे कोपरगांव शहरातील जनतेला चांगलेच माहित आहे. मा. नगराध्यक्ष महोदय, तुमचे महिलाबद्दलचे विचार महिला बॉडी शो कार्यक्रमाच्या त्याच वेळेस कोपरगांव करांच्या लक्षात आले आहे. आपण पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नैतिकतीचे धडे देत असतात हे नैतिकतेचे धडे आपल्या घरात दिले असते हि नामुष्की आली नसती.
कोल्हे परिवाराने महिलांसाठी काय केले असा प्रश्न आपण विचारला संजीवनी उद्योग समुहात व संजीवनी शैक्षणीत संकुलात आजही शेकडो महिला शिक्षीका महिला भगिनी कार्यरत आहेत. संजीवनी महिला बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा रोजगार माता भगिनींना मिळवून देऊन कोरोना काळातही काम सुरू आहे.संजीवनी महिला गारमेंट क्लस्टर मार्फत शेकडो महिला स्वावलंबी होत आहेत हे उघड्या डोळ्यांनी जावून बघा..महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी २२ कोटी पेक्षा अधिक रक्कम उभारली.कॉल सेंटरच्या माध्यमातून शेकडो युवतींना व महिला भगिनींना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी सौ.कोल्हे ताईंच्या प्रयत्नांमुळे कोपरगांव नगरपरिषदाला मिळाला आहे. हे नाकारण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे रडीचा डाव आहे.
कोल्हे ताईंनी शहरासाठी खालील कामे केली व त्याकामांसाठी मिळालेला निधी पुढील प्रमाणे-
बसस्थानक इमारत- रक्कम ५ कोटी ९२ लाख ९८ हजार,बाजार ओटे- २ कोटी ५० लाख,नगरपरिषद नवीन अग्निशामक- ३२ लक्ष ५० हजार,नगरपरिषद इमारत-२ कोटी (या व्यतिरिक्त २ कोटी निधी बंदिस्त नाट्यगृहासाठी ताईंनी मिळवला होता तो इमारतीसाठी वर्ग केला आहे)असा एकूण ४ कोटी निधी आजपर्यंत,गोकुळनगरी पूल- ३७ लाख…जिथे कवडीचे योगदान तुमचे नसतांना तुम्ही व विद्यामान आमदारांनी जाऊन उद्घाटन करुन व फोटो सेशन केले, शहर पोलीस स्टेशन नवीन इमारत- ३ कोटी ३२ लाख,डिजिटल वाचनालय- १ कोटी ३२ लाख ५३ हजार, कोपरगाव नगरपरिषदेसाठी फायर स्टेशन व कर्मचारी वसाहतीसाठी- ७४ लक्ष ९३ हजार, यु.आय.डी.एस.एस.एम.टी.पाणी पुरवठा योजनेसाठी वाढीव निधी-७ कोटी ५० लक्ष, विशेष रस्ता अनुदान (२०१६)-३ कोटी , विशेष रस्ता अनुदान (२०१७)-२ कोटी, अल्पसंख्याक बहुल विकास निधी -२० लक्ष,आमदार स्थानिक विकास निधी-१ कोटी ८५ लाख २५ हजार
या वरील कामांचप्रमाणे अजुनही काही कामांचे प्रस्ताव त्यावेळेस मंजुर करुन ठेवलेले आहे. त्यांनी मिळवुन दिलेल्या निधीमुळेच शहरात अनेक कामे अजुनही सुरु आहेत. हे आपण नाकारत असाल तरी शहरातील जनतेला माहित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *