गावनिहाय लसीकरण करण्यात यावे:- माजी सभापती सुनील देवकर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील वर्षा पासून आपल्या संपूर्ण देशात कोविडचा प्रसार वाढत आहे त्यामुळे शासनाने कोविड आजार ला प्रतिबंध घालण्या हेतुने शासनाने प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे त्याकरिता तालुक्यात लसीकरण केंद्र सुरू केले आहे.परंतु
कोपरगाव तालुक्यात कोरोणाबाबत जनजागृती झाल्याने नागरीकांना लसीकरणाचे महत्व पटु लागले आहे त्यामुळे नागरीकांची लसीकरणासाठी मागणी वाढत असल्याने तालुक्यातील प्रत्येक गावामध्येच लसीकरण केंद्र सुरू करावे तसेच कोपरगाव तालुका जिल्हाची शेवटची सीमा असल्याने मुख्यालयापासून लांब अंतरावर आहे म्हणून आतापर्यंत मिळत असलेल्या लसीपेक्षा जास्त प्रमाणात लस मिळावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांनी जिल्हा परीषद सदस्य राजेश आबा परजणे, पंचायत समित सभापती पौर्णिमाताई जगधने उपसभापती अर्जुन दादा काळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विधाते साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
वेळी मा. सभापती सुनिल देवकर शरदराव सांगळे, राजेद्र चांडे, इंद्रभान चौधरी ,सुनिल कदम उपस्थित होते
हे निवेदन स्विकारल्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश आबा परजणे यांनी आपली मागणी योग्य असल्याने लवकरच संपूर्ण तालुक्यात गावनिहाय लसी करण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *