श्री भवानी देवी पुस्तकाचे संत रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते प्रकाशन…


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरातील जुने गांव भागात देवीची साडेतीन शक्तिपीठे एकत्र असलेले प्रसिद्ध श्री भवानी देवी मंदिराची माहिती संग्रह पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संपन्न झाले.
या प्रसंगी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज, श्री भवानी देवी मंदिरच्या पुजारी सौ. उषाताई गायकवाड अध्यक्ष भालचंद्र गायकवाड,लेखक व संपादक सुशांत घोडके, अंबिका तरुण मंडळाचे विनायक गायकवाड, डॉ.मयुर जोर्वेकर, डॉ. गौरी जोर्वेकर (गायकवाड) विश्वस्त शुभम विनायक गायकवाड, निकेतन कैलास गायकवाड, साई आर्टस् संचालक सतिश गुजराती, रुपाली गुजराती, सुदाम गायकवाड, सुरेश घोडके, देविदास गायकवाड, निवृत्ती गायकवाड, बंडोपंत गायकवाड, गोपी गायकवाड, साधना गायकवाड, सुरेखा गायकवाड, तृप्ती गायकवाड, मंगल गायकवाड, वैशाली गायकवाड, स्मिता गायकवाड, ताराबाई गायकवाड, मच्छिंद्र ईश्वरे, लीलाबाई कहार, शांताबाई गायकवाड, ऋतुजा गोसावी, हरिश गुजराती, विकास आढाव, मनिष शहा,ओंकार वायखिंडे, समर्थ गायकवाड, यांचेसह श्री भवानी देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे विनायक गायकवाड यांच्या वतीने संतपूजन करण्यात आले.
या प्रसंगी संत रमेशगिरीजी महाराज म्हणाले, गोदातीर इतिहास संशोधनाचे माध्यमातून श्री भवानी देवीची महती उजेडात आणणारी ही पुस्तिका वाचनीय आणि संग्रही ठेवा आहे. श्री भवानी देवीचे महत्व मोठे आहे. येथील स्वच्छता आणि पावित्र्य पाहून समाधान वाचल्याचे सांगितले.
गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे माध्यमातून संपादक सुशांत घोडके यांनी श्री भवानी देवीची अख्यायिका आणि ऐतिहासिक माहिती संकलन करुन पुस्तकात समाविष्ट केली आहे. तसेच देवीचे मंत्र, नित्य प्रार्थना, देवीचे स्तवन, आरती, रेणुका देवीचे अष्टक, जोगवा, परडी, देवीचा काकडा, देवीचा आशिर्वाद समावेश आहे. या पुस्तक छपाईसाठी आर. आर. कार केअर, आर. आर. सर्व्हिस स्टेशन, कोपरगांव, श्री स्वामी समर्थ बाल रुग्णालय, कोपरगांव, स्वर्गीय नंदू उर्फ योगिराज विठ्ठलराव गायकवाड यांचे स्मरणार्थ योगिराज नगर, कलश बॅ्क्वेट हाॅल, कलश सिमेंट प्रोडक्टस्, साई आर्टस् यांचे सहकार्य लाभले आहे.
पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महती असलेल्या गोदातीरावरील कोपरगांव या स्थानाला विशेष महत्त्व आहे. देवी भक्त पांडूरंगबाबा यांना देवीने दिलेला दृष्टांता नंतर देवीच्या मंदिराची निर्मिती, दिंडोरीचे मोरे दादा यांचे भवानी देवी मंदिर भेटीत देवीची साडेतीन शक्तिपीठ स्थापनेचा निर्णय अशी अनेक माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
श्री भवानी देवीची माहिती, मंत्र, स्तवन, आरती, जोगवा आणि परडी एकत्र समाविष्ट असलेल्या पुस्तक निर्मितीबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
