Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठात ऊस संशोधन प्रकल्पाच्या 36 व्या द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि भा.कृ.अ.प. भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात दि. 15-16 ऑक्टोबर, 2026 रोजी अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्पाच्या 36 व्या द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील कृषि संशोधन व शिक विभागाचे सचिव तथा भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम.एल. जाट हे उपस्थित असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील उपमहासंचालक (पीक विज्ञान) डॉ. डी. के. यादव, सहाय्यक महासंचालक (व्यापारी पिके) डॉ. प्रशांत के. दाश, सहायक महासंचालक (बियाणे) डॉ. पी.आर. चौधरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कोईम्बतूर येथील भारतीय ऊस प्रजनन संस्थेचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, लखनऊ येथील भारतीय ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस.एन. सुशील, या कार्यशाळेचे आयोजन सचिव तथा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. दिनेश सिंग उपस्थित असणार आहेत.
ही दोन दिवसीय बैठक प्रामुख्याने गेल्या वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी वर्षाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये देशभरातील 39 ऊस संशोधन केंद्रातील 150 संशोधक व प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विविध विभागातील शास्त्रज्ञ प्रायोगिक चाचण्यांचे निष्कर्ष सादर करतील. या बैठकीत विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात येणार आहे अशी माहिती संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *