
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डी लोकसभेतील सहा तालुक्यात उत्तम दर्जाचे कोरोना केअर किट शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसतर्फे वाटप करण्याचा उपक्रम अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी हाती घेतला असून महसूलमंत्री नामदार थोरात साहेब, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम २४ मे पासून सुरू करण्यात आला. शिर्डी येथील श्रीसाईबाबा हॉस्पिटल व शिर्डी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना सदरील केअर किटचे वाटप केले. प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन भाऊ चौगुले,शिर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमृत गायके, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,
माजी नगरसेवक सुरेशभाऊ आरणे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
तुषार पोटे
उपाध्यक्ष,
अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस
9561117117
