Uncategorized

आत्मा मालिक गुरुकुलच्या १८ लॉन टेनिस खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी (कोकमठाण) :- अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय लाॅन टेनिस स्पर्धा आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकूलच्या खेळाडूंनी गाजवीली. या संस्थेच्या तब्बल अठरा खेळाडूंची पुणे येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले, आदिती घोरपडे, ज्ञानेश्वरी काळे, विज्ञानी कुंभार, श्रेया ढोकळे, आर्या वाघमोडे (१७ वर्षे मुली), हर्षद कडूस, पृथ्वीराज खोले, सोहम भगत, साईराज देवकाते, देव गायकवाड(१७ वर्षे मुले), आरती तुरे, राशी सरोवर, शर्वरी आगरी, तनुष्का कोरडे, मनाली पवार (१९ वर्षे मुली), रुद्राक्ष बोरसे, आदित्य पराठे, श्रेयस देशमुख, प्रज्वल गिरी (१९ वर्षे मुले)यांचा समावेश आहे. पुणे येथे होणाऱ्या विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक रविंद्र नेद्रे तसेच प्रशिक्षक अभिषेक कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी , उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

——-चौकट——–
नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) ः- या विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आत्मा मालिक गुरूकूलच्या अठरा विद्यार्थ्याची विभागीय लाॅन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *