डॉ. अजयजी गर्जे यांच्या ‘गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअर’ हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे उदघाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे यांच्या शुभहस्ते व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे डॉ. अजयजी गर्जे यांच्या ‘गर्जे ई.एन.टी. अँड चाईल्ड केअर’ हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे उदघाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे यांच्या शुभहस्ते व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


यावेळी श्री. राजेशआबा परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. दिनारजी कुदळे, श्री. राजाबापू जाधव, डॉ. दत्तात्रयजी मुळे, डॉ. चोथाणी, डॉ. रामदासजी आव्हाड, डॉ. संदिपजी मुरूमकर, डॉ. रमेशजी सोनवणे, डॉ. राठी, श्री. अरविंदजी भन्साळी, श्री. संजयजी भन्साळी, श्री. प्रसादजी नाईक, श्री. एस.एल. कुलकर्णी, श्री. नकुलजी गर्जे, डॉ. वरदजी गर्जे, डॉ. पूजाताई गर्जे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
