कोपरगांवात भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक येथे सार्वजनिक उत्सव समिती यांचे वतीने भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेचे पुजन संत रामदासी बाबा भक्त मंडळाचे शरदराव थोरात, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त धरमचंद बागरेचा, जेष्ठ विधिज्ञ जयंतराव जोशी, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके, मराठा पंचाचे अध्यक्ष अॅड. संजयराव भोकरे, पौरोहित्य बाबासाहेब जंगम यांचे शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमोद नरोडे पाटील, श्री दत्तपार देवस्थानचे अध्यक्ष रविंद्र को-हाळकर, स्वच्छतादूत सुशांत घोडके, रसराजचे संचालक निलेश साबळे पाटील, रामदास खैरे, विनायक गायकवाड, ब्राम्हण सभा अध्यक्ष मकरंद को-हाळकर, डॉ. व्यंकटेश वाळेकर, विलास जंगम, कैलास जंगम, रमेश रोडे, प्रभाकर वाणी, संतोष गंगवाल, सुनील गोखले, अनिल वायखिंडे, सुरेश कांगुणे, विनित वाडेकर, राजेंद्र खैरे, वसंत जाधव, सादिक शेख, कैलास निकम, अनिल काले, नितीन काले, रितेश कुदळे, अनिल पारख, बि. डी. कुलकर्णी, निलेश जाधव, श्रीकृष्ण देशपांडे, नंदू जोशी, ललीत ठोंबरे, एस. डी. देशपांडे, रविंद्र निकम, संतोष साबळे, ललित ठोंबरे, हलवाई, किशोर मांडगे, संदिप गऊल, किशोर काळे, यांचेसह स्थानिक व्यापारी उपस्थित होते.

प्रारंभी भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेचे विधिवत पुजन करुन शंकराची आरती करण्यात आली. तसेच हर हर महादेव, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांचे नावाचा जयघोष करण्यात आला. उपस्थितांनी एकमेकांना अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा दिल्या. शिवभक्त भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची माहिती स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सांगून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *