कोपरगाव मध्ये दि. ८ आणि ९ मे २०२१ रोजी शनिवार व रविवार या दोन दिवस अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी:- नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी दि.३०/०४/२०२१ रोजी रात्री ८.०० वा पासून ते दि.०८/०५/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत जनता कर्फ्यु ठेवण्यात आला होता.
त्याअनुषंगाने दि. ८ आणि ९ मे २०२१ शनिवार व रविवार या दोन दिवस अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. यादरम्यान नागरिक, व्यापारी व आस्थापना प्रमुख यांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग इ. नियमांचे पालन करावे.
कोपरगाव शहरात आठ दिवस जनता कर्फ्यु असून देखील दैनंदिन कोरोना बाधित रुग्ण आकडेवारी कमी झालेली नसल्याने दोन दिवसाचा ब्रेक घेऊन कोरोना प्रतिबंध करणेकामी कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार रविवार दि.०९/०५/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ते शनिवार दि.१५/०५/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत जनता कर्फ्यु वाढवण्यात आला आहे.
या दरम्यान फक्त शहरातील दवाखाने, मेडिकल (२४ तास), पाणी जार, दुध व पीठ गिरणी इ. (सकाळी ७ ते ११ वा.यावेळेत) सुरु राहतील. याशिवाय भाजीपाला, फळे, किराणा व इतर सर्व व्यवसाय १००% बंद राहतील. कोपरगाव शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, व्यापारी सर्वांनी याची नोंद घ्यावी.
कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्युचे थैमान थांबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून प्रत्येकाने स्वतःचा व कुटूंबाचा बचाव करावा ही नम्र विनंती.
नियमाचे उलघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
घरी राहा…. सुरक्षित राहा…
विजय वहाडणे नगराध्यक्ष,

स्वप्निल निखाडे उपनगराध्यक्ष
सर्वपक्षीय नगरसेवक कोपरगाव नगरपरिषद
कोरोना नियंत्रण समिती, कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *