कोपरगांवात आधार दुरुस्ती शिबीर संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
डाक विभाग आणि सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे संयुक्त विद्यमाने टपाल विभागाच्या “डाक चौपाल” अभिनव उपक्रम आणि सूर्यतेज संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आधार कार्ड नवीन आणि दुरुस्ती शिबीराचे आयोजन ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात करण्यात आले होते.

शिबिराला डाक अधीक्षक जनावडे, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,डाक निरीक्षक अनंत सोनवणे,पोस्ट मास्तर राजेश नेतनकर, कैलास हाडोळे, डाक सहाय्यक विशाल गवळी यांचेसह नागरिक उपस्थित होते.
आधार कार्ड शिबीरात नवीन जन्म झालेल्या पाच वर्षा आतिल बालकांचे नविन आधार, आधार मोबाईल नंबर लिंकिंग, आधार दुरुस्ती, बायोमेट्रिक दुरुस्ती अशा विविध दुरुस्ती दोन दिवसीय शिबीरात करण्यात आल्या आहेत. या शिबीरात शहर व ग्रामीण भागातील १८६ नागरिकांनी लाभ घेतला.
शिबीराचे यशस्वीतेसाठी मराठा पंच मंडळ, सुवर्णकार व्यापारी, सोमेश्वर महादेव देवस्थान, कोपरगांव डाक विभागाचे राहुल डमाळे, विजय जोर्वेकर, शाखा डाकपाल स्वप्नील भगत, ओम दहीभाते, विजय गुंजाळ, बापूसाहेब चव्हाण, गौरव गाढे, गौरव वाघ, अर्जुनराव मोरे, संजय ढेपले, सूर्यतेजचे अनंत गोडसे, मंगेश भिडे, गणेश आंबोरे, प्रदिप पदे, दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे श्रीराम येवले, मनोज कपोते, सुधाकर जाधव यांचे सहकार्य लाभले.
१ वर्षाच्या बाळा पासून ते ९६ वर्षाच्या वयोवृद्धांनी या शिबीरात सहभागी होवून आधार कार्ड विषयी आपल्या समस्या सोडविण्यासाठी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *