कोविड लस देताना प्राथमिक शिक्षक व नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोविड लस देताना प्राथमिक शिक्षक व नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रम द्यावा अशी विनंती देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले साहेब यांना ईमेल द्वारे केली आहे. व त्याची प्रत राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना पाठविली आहे.
जिल्हाधिकारी साहेबाना पाठविलेल्या ईमेल मध्ये ढुस यांनी म्हंटले आहे की, सध्या नगरपालिकेचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांना घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम दिले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्व कर्मचारी काम करीत असताना त्यांना अद्यापही कोविड लस देताना प्राधान्यक्रम दिलेला नाही.
कोविडच्या फ्रंट लाईन मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लस देने आवश्यक असल्याने कृपया जिल्हा परिषदेचे सर्व प्राथमिक शिक्षक, नगरपंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगार दिनाचे औचित्य साधून कोविड लस देनेचा निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना लस देताना प्राधान्यक्रम देणेत यावा अशी विनंती करून त्या कामी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत असे आप्पासाहेब ढुस यांनी ईमेल मध्ये शेवटी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *