ज्योती प्रकाश फाउंडेशन चे अध्यक्ष, जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त प्रकाशची भट यांच्याकडून दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-ज्योती प्रकाश फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे विश्वस्त माननीय प्रकाशची भट साहेबांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हार(भगवतीपूर)येथील ४० दिव्यांग कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप केले आहे,

दिव्यांग समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रामचंद्र शिंदे यांनी पत्राद्वारे किराणाचे किट वितरण करुन दिव्यांग बांधवांना मदत करावी अशी मागणी केली होती. लगेच या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लाभार्थ्यांना पर्यंत किराणा स्वतः घेऊन जाऊन वाटप केले या प्रसंगी आत्मा मलिक वाडा आश्रम चे अध्यक्ष विलास आकरे यांनीही उपस्थिती दाखवली


तसेच गुरुदेव यांच्या कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली सर्व लाभार्थी खूप खुश दिसत होते तसेच यापुढेही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू अशी आश्वासन ज्योती प्रकाश फाउंडेशन अध्यक्ष भट साहेब यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *