नागपूर येथे युवकांचा शेतीमधील सहभाग या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
अँग्रोव्हिजन फाउंडेशन यांच्यावतीने 15 वे ॲग्रोव्हिजन या भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनाचे आयोजन दि. 22 ते 25 नोव्हेंबर, 2024 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ मैदान दाभा, नागपूर येथे करण्यात आले आहे. या 15 व्या ॲग्रोव्हिजनमध्ये युवकांचा शेतीमधील सहभाग या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शेती समृद्धीसाठी यंत्र, तंत्र व व्यापारवाढीचे मंत्र या संकल्पनेवर ही कार्यशाळा आधारित असून यावेळी राष्ट्रीय कृषि प्रदर्शन, शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळा तसेच चर्चासत्रांचे आयोजन यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी सर्व कृषि विद्यालय, कृषि तंत्र विद्यालय व कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या माहितीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांचेकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *