कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांच्या तिसऱ्या पिढीतील विवेक भैय्या कोल्हे यांनी एकाच छताखाली एका दिवसात ३१२४ युवकांना नोकऱ्या उपलब्ध करुन देतांना मारला लाजवाब मास्टर स्ट्रोक:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांनी आपल्या आयुष्यातील ७० वर्षे अहोरात्र शेतकरी, शेतमजूर , छोटे व्यावसायिक, व्यापारी,महिला यांना स्वबळावर मजबूत पायावर उभे करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले. याचमुळे या कोपरगांव तालुक्यात शेतकऱ्यांवर साठ वर्षांच्या कालावधीत आत्महत्या करण्याची वेळच आली नाही. हाच वारसा अखंडपणे संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, यांच्या संस्कार, मार्गदर्शन व संपूर्ण सहभाग बळावर कोपरगांव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित दादा कोल्हे , आंतरराष्ट्रीय इपकोचे संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे विश्वस्त सुमित. दादा कोल्हे यांनी संपूर्ण कोल्हे परिवारासह संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था व संजीवनी उद्योग समूहाचे माध्यमातून
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून नितीन दादा कोल्हे आणि बिपिन दादा कोल्हे यांच्या कुशल दिर्घ दृष्टीचे मार्गदर्शक बळावर गेली २० वर्षांपासून जन उध्दाराचा विडा उचलला सौ स्नेहलता कोल्हे ,सौ‌. रेणुकाताई कोल्हे २५वर्षात तालुक्यातील २० हजार महिलांना संघटित करून दरवर्षीच्या अब्जावधी रुपयांची व्यावसायिक उलाढाल घडविण्यात यशस्वी ठरल्या. याच माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वतःचे बळावर सर्व सुविधा उपलब्ध असणारी स्वमालकीची पक्की घरे , लघुउद्योग , मुला-मुलींना उच्च शिक्षण सुविधेतून उत्तम रोजगार, यशस्वी विवाह, आदी धार्मिक उत्सव आणि समारंभ, धार्मिक तीर्थक्षेत्र यात्रा, पुर्वीच्या कर्ज फेडी नविन व्यवसाय भांडवल उभारणी , गरजेच्या वस्तु खरेदी, प्राणघातक व अत्याधुनिक अत्यावश्यक आजार उपचारासाठी आर्थिक तरतूद यासह भावी काळातील खर्चासाठी आर्थिक तरतूद करण्यात यामहिलांना यश लाभले .
अमित दादा कोल्हे, विवेक भैय्या कोल्हे,सुमित दादा कोल्हे यांनी संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या माध्यमातून तरुणांना केवळ उच्च प्रगत शैक्षणिक सुविधा पुरविण्यात समाधान न मानता विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, पातळीवर गेल्या दहा वर्षांत स३०००० तरुणांना प्रगत उच्च शिक्षण संधी आणि नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात अव्वल स्थान मिळवले. याचमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च शैक्षणिक समूहाचे यशस्वी सहभागाने संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या शैक्षणिक उपक्रमांची दखल घेत केंद्र सरकारने संजीवनी ग्रामीण शिक्षण विद्यापीठास मान्यता दिली आहे. गत दहा वर्षांत किमान २०० नोकर भरती मेळाव्यातून ६० हजार तरूणांना आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील लाखो रुपयांच्या नोकरीचे पॅकेज मिळवून देताना दहा हजारांहून अधिक उद्योजक घडविले तर आपल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहात दहा हजार कुटुंबांना शासकिय मान्यतेचे रोजगार पुरविले आहेत. .
याशिवाय कमी शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी पोलिस – सैनिक , वाहन चालक, आदी विविध स्वरूपाचे प्रशिक्षणासह नोकर भरती मेळावे यशस्वी केले.
संजीवनी उद्योग समूह, कोपरगांव तालुका शेतकरी संघ ,स़जीवनी सहकारी साखर कारखाना आदिंच्या माध्यमातून सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांना बी-बियाणे औषधे खते भ्रष्टाचार विरहित विनासायास मिळवून दिल्याने शेतकऱ्यांना फार मोठा लाभ झाला. कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,कोपरगांव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी आपले राजकीय प्रभूत्वाचे बळावर केंद्र ,राज्य शासनाकडून कोपरगाव शहर व तालुका पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी सोडविला सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोपरगांव ग्रामीण रुग्णालय , कोपरगांव बस स्थानक, नगर परिषद इमारत, कोपरगांव शहरातील पाच साठवण तलावासाठी कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना वेळोवळी भेटून जमीनी संपादन केल्या येवला नगर परिषद पाणी साठवण तलाव चाळीस वर्षे मोफत वापरासाठी मिळविला केंद्र व राज्य शासन निधी मिळवून भूमीगत जलवाहिन्या खरेदी जलवाहिन्या जोडणी खर्चात नगर परिषदेचे १८कोटी वाचविले .सलग ४०वर्षे संजीवनी उद्योग समूहाने कुशल कर्मचारी आणि अधिकारी यंत्रणा यंत्रसामुग्री यासह सर्व प्रकारचे मोफत सहकार्य दिले दुष्काळात तालुका आणि शहरात पाणी पुरवठा घर पोच केला. कोरोना काळात घरपोच सॅनिटायझर, मास्क, अत्यावश्यक औषधे रूग्ण नातेवाईक यांना मोफत घरपोच दोन वेळेचे जेवण पुरविले कोरोना उपचार रुग्णालय स्वबळावरच उभारणी केली, ऑक्सिजन सिलेंडरमध्ये कमतरता भासू दिली नाही. आदी कामे यशस्वी रित्या पार पाडली ‌.
कौतुकास्पद बाब म्हणजे स्वबळावर कोणत्याही स्वरूपात कुबड्या न घेता, जिद्दीने स्वबळावर कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या तीनही पिढ्यांची ही वाटचाल खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारी असल्याचा प्रत्यय जनतेला कायमस्वरूपी येतो हिच ह्या कुटुंबीयाची खासियत आहे.
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या तीनही पिढ्यांचा सामाजिक कार्याचा भाग म्हणून विवेक भैय्या कोल्हे तालुक्यातील ६०हजार तरुणांचीवाढणारी जीवघेणी बेरोजगारी समूळ नष्ट करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी स्विकारून वाढत्या नागरीकरण आणि औद्योगीकरणातील विविध प्रकारच्या समस्यांना बळी पडणाऱ्या युवकांच्या अत्यावश्यक गरजा भागवून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि खंबीर आधार देण्यासाठी तसेच वाढती लोकसंख्या, महागाई यामुळे वाढणाऱी जीवघेणी बेरोजगारी समूळ नष्ट करण्याचे अतुलणीय धाडस विवेक भैय्या कोल्हे यांनी कोणत्याही स्वरूपात कुबड्या न घेता केल्याचा निर्धार ज्या दिवशी केला त्याच वेळी कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांची आठवण मला होण्याबरोबरच हे काम कितीही अडथळे निर्माण झाले तरी ते पूर्ण होणारच याची मनात खूण गाठ बांधली. निस्वार्थी पणे जिद्दीने जनहितार्थ हा उपक्रम राबविला यामध्ये ऑनलाईन स्वरूपात अर्ज करणाऱे ८१८०व ऐनवेळी १५०० अशा ९६८० गरजू युवकांनी या मेळाव्यात भाग घेतला. यापैकी६८६५ म्हणजे ७०.९२ टक्के युवकांच्या मुलाखती पार पडल्या यातून ३१२४ युवकांची म्हणजे४५.७४ टक्के युवकांची एका छताखाली एका दिवसात निवड झाली . उर्वरित ५४.२६ टक्के युवकांना टप्प्या टप्प्यात योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणातून लाभ दिला जाईल तसेच भावी काळात सत्तेवर असो अथवा नसो तरीही असे मेळावे दरवर्षी भरविले जातील अशी ठाम ग्वाही दिली
अशा अतुलनीय व जनहितार्थ कार्याने मी व माझे कुटुंबिय भारावून गेलो. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनीसाहेब कर्तृत्ववान विवेक भैय्या कोल्हे आणि संपूर्ण कोल्हे परिवार त्यांचे सर्व सहकारी यांचे आम्ही अग्रवाल परिवारअभिनंदन करीत असून नवरात्रौत्सव निमित्ताने त्यांचे शुभ हस्ते भावी काळात अद्वितीय सत्कार्य घडो तसेच या सर्वांना वत्यांचे कुटुंबियांना भावी आयुष्य सुखदायक आरोग्य आणि सुखसमृद्धी चे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *