के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशन च्या वतीने दि.20 सप्टेंबर रोजी आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथे संघ निवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर संघात के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेचे कु. यश ढेंगिया व कु. निखिल नालकर या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे दोनही विद्यार्थी दि.28 ते 30 सप्टेंबर 2024 या दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळणार आहे. राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी दोन्ही विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीबद्दल को.ता.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड.संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती सुनिता बालवे, श्रीमती यास्मिन शेख, श्रीमती दिपाली पटवर्धन, प्राध्यापक श्री. संदिप जगझाप, क्रीडा शिक्षक श्री. मिलिंद कांबळे व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *