
कोपरगाव प्रतिनिधी:-
आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे दरवर्षी दिला जाणारा वैद्यकीय क्षेत्रातील भारतातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद अवार्ड कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ रामदास म्हाळूजी आव्हाड यांना नुकताच जाहीर झाला .
रोख रक्कम ,मानपत्र ,शाल ,स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला हा पुरस्कार दरवर्षी आयुर्वेद क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या भारतातील फक्त तीन आयुर्वेद डॉक्टर्स ला दिला जातो .धन्वंतरी जयंती व आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून हा पुरस्कार आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे दिला जातो .आरोग्य मंत्री भारत सरकार व अन्य मंत्रिगणांच्या उपस्थितीत यंदा हा भव्य सोहोळा पंचकुला हरयाणा येथे धनत्रयोदशी शुक्रवार दि 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे .यावर्षी प्रथम क्रमांकाची पसंती कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व गेल्या आठ वर्ष्यापासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्ली तर्फे आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती झालेले डॉ रामदास आव्हाड यांना मिळाली .त्यांच्याबरोबर डॉ पंचाभाई दमानिया (गुजराथ )व डॉ माधवन (त्रिवेंद्रम )यांचीही या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून निवड झाली ..आयुर्वेद क्षेत्रातील भारत सरकार तर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो .यापूर्वी ही गेल्या 35 वर्ष्यापासून कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ आव्हाड यांना 40 हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत .निस्वार्थ मनाने व प्रामाणिक पणे आयुर्वेद केल्याचे हे फळ असून ग्रामीण भागात राहणाऱ्या माझेसारख्या सामान्य वैद्याचीही दखल घेतली जाणे हे भाग्याबरोबरच कौतुकास्पद ही असल्याचे डॉ आव्हाड प्रतिक्रियेत म्हणाले ..सर्व भारत भरातून उच्च पदस्थ व्यक्तीकडूनही अभिनंदन होत असल्याने या पुरस्काराचे महत्व आज वाटू लागल्याची भोळी प्रतिक्रियाही डॉ आव्हाड यांनी दिली …शिव प्रतिष्ठान तर्फे पुढील महिन्यातही तंजावर येथे डॉ रामदास आव्हाड यांचा सह्याद्री भूषण पूरस्कार देऊन सत्कार होणार असल्याचे जाहीर झाले आहे ..
