
कोपरगाव प्रतिनिधी:-
धुळ्याच्या पोलिसाचा शिर्डीत प्रामाणिक पणा साईबाबा संस्थान शिर्डी येथे ड्युटी करणाऱ्या धुळ्यातील एका पोलिसाने खाकीचा ईमान राखत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले . या पोलिसाने साईबाबा मंदिरात पडलेली पर्स आणि त्यातील तीन हजाराची रोकड शिर्डी साई संस्थानच्या ताब्यात दिली . साई संस्थान ओळख पटवून ही पर्स आणि रोकड संबंधीत भाविकाला देणार आहे . धुळ्यातील रहिवासी असलेले आणि पोलिस मुख्यालयात ड्युटीला असलेले कलीम शेख हे सध्या शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात कर्तव्यावर होते . मंदिरात ड्यूटी निभावत असतांना त्यांना एक पर्स आढळून आली मंदिरात पर्सला कोणीच वाली नसल्याने त्यांनी खाकीशी इमान राखत आपल्यातील प्रामाणिकपणा जागृत ठेवत ही पर्स साईबाबा संस्थानच्या ताब्यात दिली पर्समध्ये तीन हजाराची रोकड होती पोलिस कर्मचारी कलीम शेख यांच्या कर्तव्य तत्परतेचे आणि प्रमाणिकपणाचे साई संस्थान सहपोलिसांनी कौतुक करीत त्यांचे अभिनदंन होत आहे .. रोहिदास हाके
