साईआश्रया परिवार येथे भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
साईबाबांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या साईआश्रया परिवार येथे भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिर्डी नगरपंचायत च्या नगरसेविका माननीय सौ वंदनाताई राजेंद्र गोंदकर (भाजपा उत्तर नगर जिल्हा महिला आघाडी संघटन मंत्री) या उपस्थित होत्या.

यांनी महिला दिनानिमित्त साई आश्रयातील मुली व महिलांशी हसून खेळून आनंदाने संवाद साधला जीवनात आईचे व गुरुचे काय महत्त्व असते संगोपन करणाऱ्या चे काय महत्व असते 8 मार्च महिला दिन का साजरा करण्यात येतो.

या सर्वांचे महत्त्व समजून सांगितले यावेळी येथील मुलींच्या व महिलांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी वंदनाताई यांना साई आश्रयातील निराधार मुले,मुली आजी,आजोबा व महिला अनेक कठीण परिस्थितीतून याठीकाणी आले आहेत. येथील महिला निराधार असून या ठिकाणी अतिशय आनंदाने राहत आहे याचे समाधान त्यांना वाटले.


ओम साई राम साई सेवक:- गणेश दळवी. Mo:- 9637549300.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *