

कोपरगाव प्रतिनिधी:-
मराठी पञकार परिषद ही पञकाराची मातृसंस्था परिषदेचे कार्यक्रम म्हणजे अप्रतिमच. उत्कृष्ट नियोजन व शिस्तबध्दता या प्रमुख वैशिष्ट्यात प्रत्येक कार्यक्रम संपन्न होतो. राज्यस्तरीय जीवन गौरव व विभागनिहाय उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार हे प्रतीवर्षी दिले जातात यावर्षी चा 2022 चा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शाखेच्या नियोजनात संपन्न झाला. परीषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री एस एम देशमुख सर व विश्वस्त मा.श्री किरण नाईक सर यांचे व परिषद पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. मुंबई शाखेने उत्कृष्ट नियोजनात हा सोहळा संपन्न झाला.


या साठी परीषदेचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक मा.श्री किरण नाईक, मुंबईचे अध्यक्ष राजाभाऊ आदाटे , विभागीय सचिव दीपकजी कैतके, विनायकजी सानप, संजयजी मिस्कीन, दीपकजी पवार, पांडुरंगजी म्हस्के या टीमवर्क मुळे पत्रकार सन्मान सोहळा यशस्वी झाला. मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा. या कार्यक्रमास उपस्थित असणारी प्रमुख मान्यवर केंद्रीयमंञी मा. ना. श्री. नितिनजी गडकरी व नेञतज्ञ पद्मश्री डाॕ तात्याराव लहाने या दिग्गजाची उपस्थिती हे हि खास वैशिष्ट्यच होते. मराठी पञकार परीषदेच्या भावी कार्याला वेगळी दिशा व शक्ती देण्याचे काम हा कर्यक्रम करेल हे माञ निश्चीत आयोजक व संयोजकाचे आभार व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा…
आपला
अनिल महाजन
राज्य जनसंपर्क प्रमूख
मराठी पञकार परिषद, मुंबई…
