नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह शिष्टमंडळाने मा.सहाय्यक संचालक,नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग ,अहमदनगर यांची आज भेट घेतली…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी खोकाशॉप व गाळे बांधण्यासाठी मान्यता मिळावी यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह शिष्टमंडळाने मा.सहाय्यक संचालक,नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग ,अहमदनगर यांची आज भेट घेतली.शहरातील सुशिक्षित-अशिक्षित बेरोजगार, छोट्या व्यावसायिकांना, विस्थापितांना जास्तीतजास्त खोका शॉप उपलब्ध व्हावेत यासाठी साधकबाधक चर्चा करण्यात आली.यावेळी नगरसेवक रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष निखाडे,संदिप वर्पे,मेहमूद सय्यद,जनार्दन कदम,मंदार पहाडे,कैलास जाधव,विनायक गायकवाड व सहकारी, कनिष्ठ अभियंता बडगुजर,व्यापारी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
बाजारतळ येथे खोका शॉपसाठी मान्यतेची केवळ औपचारिकता उरलेली आहे.काँग्रेस कमिटी जवळ,धारणगाव रोड,पुनम थिएटर समोर,एस.जी.विद्यालय भिंतीलगत,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, टिळक नगर शॉपिंग जवळ,येवला रोड,बुब हॉस्पिटल जवळ इ.ठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी द्यावी अशी मागणी सर्वांनीच केली.पण फक्त नगरपरिषदेच्या मालकी असलेल्या जागेवरच परवानगी(मान्यता)मिळेल असे उत्तर मा.सहाय्यक संचालक श्री.बागुल व श्री.पवार साहेबांनी दिले.


आता यानंतर खोका शॉपसाठी अजून काय करता येईल यावर निर्णय घेण्यासाठी स्थानिक पातळीवर मिटिंग घेऊन चर्चा विचारविनिमय करावा लागणार आहे.यासाठी एखादी सर्वसमावेशक कमिटी स्थापन करावी लागणार आहे.लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
पण कृपया या विषयावर सोशल मिडिया किंवा बातम्यांद्वारे कुणीही आरोप-प्रत्यारोप करू नयेत.ज्यांना याबाबत काही सुचवायचे असेल तर लेखी कळवावे किंवा प्रत्यक्ष चर्चा करावी.शहरातील व्यापारी नागरिक व रहदारीला अडथळा
होणार नाही याचे भान ठेवावे लागणार आहे.
विजय वहाडणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *