
कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मोनिका वराडे हिची गरवारे कॉलेज, पुणे येथे नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय ‘तलवारबाजी स्पर्धे’त निवड झाली.यातून तिला पुढे १६ ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत जम्मू विद्यापीठ, जम्मूतावी येथे खेळल्या जाणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.
तिच्या या अभिमानास्पद निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे,तिचा मान. श्री. संदीपराव वर्पे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था व श्री. सुनील गंगुले सदस्य,महाविद्यालय विकास समिती यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप, प्रबंधक श्री ठोंबरे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री गोसावी सर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक, माजी खेळाडू व सर्व विद्यार्थी खेळाडू यांनीही अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार, प्रा.शिवप्रसाद जंगम, प्रा. आकाश लकारे व श्री. मयूर साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
