जिजाऊ महिला मंडळ,कोपरगांवचा उपक्रम, रंगभरण स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न…

Uncategorized

कृष्णा उदावंत सराफ व रसराज मेडिकेअरचे सहकार्य…

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते सुशांत घोडके यांचा सन्मान…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील जिजाऊ महिला मंडळ, कोपरगांव आयोजित कृष्णा उदावंत ज्वेलर्स, कोपरगांव व रसराज मेडीकेअर, कोपरगांव प्रायोजित रंगभरण स्पर्धा बक्षिस वितरण व रंगवलेल्या चित्रांचे प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा मा. नगरसेविका सौ. विजया संदीप देवकर , अ्ँड. रश्मी मनोज कडू , सौ.रामेश्वरी मिलींद जोरी डाँ.मजुषा बाणेश गायकवाड,सौ. पुजा नितीन देशमुख,सौ. प्रतिभा सुनिल शिलेदार सौ. स्वप्नजा प्रशांत वाबळे, डॉ. सौ. सुमिता आप्पासाहेब आदिक,सौ. सिमा अविनाश पानगव्हाणे, सौ. निशा सचिन गवारे यांचे सह महिला मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कृष्णा उदावंत सराफचे संचालक व लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत व रसराज मेडिकेअरच्या संचालिका स्मिता शैलेश साबळे, रसराज मेडिकलचे शैलेश साबळे हे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके होते.या कार्यक्रमाप्रसंगी रंगभरण स्पर्धा, गौरी गणपती सजावट पारितोषिक वितरण सोबत महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरिय पुरस्कार घोषित झाल्याबद्दल सुशांतजी घोडके यांचा सत्कार करण्यात आला आहे.


या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशांत घोडके म्हणाले, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आचरण लहान मुलांमध्ये रुजविण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घ्यायला हवेत.वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन सारख्या कार्यातून मनस्वी समाधान मिळते. चित्रकला,रंगभरण स्पर्धेच्या माध्यमातून लहानमुलांनी रंगविलेल्या चित्रांकडे पाहून उर्जा मिळते.असे सांगत जिजाऊ महिला मंडळाने आयोजित केलेला उपक्रम आणि करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रसराज मेडिकलचे संचालक व युवा नेते शैलेश साबळे यांनी यापुढेही सामाजिक कार्यात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तर दूसरे प्रमुख पाहुणे कृष्णा उदावंत सराफचे संचालक व लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत यांनी महिलांसाठी कोलोस्ट्राॅल व रक्त तपासणी शिबिर मोफत आयोजित करणार असल्याची घोषणा केली.
रंगभरण स्पर्धेत एकुण १० शाळा सहभागी झाल्या होत्या. चार गटात हि स्पर्धा संपन्न झाली. प्रत्येक गटात तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत भाग घेतलेल्या ९०० मुलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चित्र साकारले होते.विद्यार्थ्यांना या स्पर्धेचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले आहे.तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.स्पर्धेचे परिक्षण वरिष्ठ कला शिक्षक अतुल कोताडे, रविंद्र कांबळे यांनी केले.


प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई देवकर यांनी तर सूत्रसंचालन सौ.राजश्री पिंगळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार सौ रश्मी कडू यांनी मानले. जिजाऊ महिला मंडळाने समाज उपयोगी विविध उपक्रम राबवित असल्याबद्दल मंडळाच्या सदस्यांचे उपस्थितांनी कौतुक केले आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी सौ वैशाली काकडे, सौ वर्षा कापसे ,सौ रूपाली भोकरे, सौ सोनाली शिंदे, सौ रूपाली गवारे ,सौ शितल देशमुख ,सौ.सोनाली बंडू शिंदे व सर्व महिला मंडळ सदस्य तसेच सर्व शाळांचे शिक्षक/ शिक्षिका व स्पर्धकांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *