
कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स, अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि आय.क्यू.ए.सी. अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.’ग्राहक हक्क व आर्थिक साक्षरता जनजागृती’ या विषयावरील या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. श्री धृपद गायकवाड, मा.श्री नंदकुमार मेनन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यशाळेचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी भूषविले. या कार्यशाळेतील प्रमुख वक्ते मा.श्री. नंदकुमार मेनन यांनी ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क, गुंतवणुकीचे प्रकार,अल्पबचत योजना याविषयी मार्गदर्शन करून वित्तीय साक्षरता कशी साध्य करावी, हे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे सांगितले. तसेच वक्ते श्री. धृपद गायकवाड यांनी , ग्राहकांची फसवणूक कशी होते व ती दूर करण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे,याबद्दल विविध दाखले देत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सानप यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आर्थिक नियोजन हे प्रत्येक देशाने करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्थव्यवस्था मोडकळीस येते. त्यासाठी वित्तीय साक्षरता सर्वांकडे असणे आवश्यक आहे. कार्यशाळेचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.तऱ्हाळ बी.ए. यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीमती चव्हाण एस. यांनी केले. कार्यशाळेप्रसंगी अर्थशास्त्र विभागातील डॉ.वाघमोडे बी.एम.,डॉ. भिलोरे वाय.एम.प्रा. बागुल वाय.के.,प्रा.पाटोळे ए.जी. मराठी विभागातील प्रा.डॉ.शेंडगे बी.आर.,प्रा.दिघे एम. के.,प्रा.गायकवाड एस.एस., प्रा.डॉ.दाणे वाय.व्ही.आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.दिघे एम.के. यांनी मानले .
