
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर शिवसेना द्वारा वयोवृद्ध, निराधार, अंध व्यक्तीं श्री.वखारे गुरु यांची नेत्ररोग शस्त्रक्रिया करून त्यांना द्रुष्टी प्रदान करुन श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
गेली १०/१५ वर्षांपासून श्री. वखारे गुरु नेत्रहिन होते. त्यांची कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये डॉ. तेजश्री अमित नाईकवाडे व डॉ. प्रशांत सलगिले यांनी १९ फेब्रुवारी रोजी अवघड अशी नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांना नेत्रज्योत देऊन त्यांच्या जिवनात नवीन प्रकाश फुलवला. त्यासाठी कोपरगाव शिवसेना चे श्री.राजाभाऊ झावरे जिल्हाध्यक्ष, कलविंदर सिंग दडीयाल शहराध्यक्ष यांनी हॉस्पिटल चा खर्च केला, श्री.भरत मोरे एस.टी कामगार सेना यांनी सुध्दा त्यांचे मेडीकल असुन मेडीकल खर्च देण्यात आला.
तसेच संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे श्री. चांगदेव कातकडे व डॉ. प्रसाद कातकडे , कुकुशेठ सहानी व चेतन खुबाणी यांनी चांगल्या प्रकारे मदत केली यांचे संपूर्ण सहकार्य लाभले.
